अकोल्यातील चार रस्त्यांसाठी सात कोटी 35 लाख मंजूर – आ. पिचड

file photo

अकोले – अकोले तालुक्‍यातील प्रवरा व मुळा परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेअंतर्गत चार रस्त्यांसाठी सात कोटी 35 लाख व पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी 37.33 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. वैभव पिचड यांनी दिली.

आ. पिचड म्हणाले, अकोले तालुक्‍यातील प्रवरा परिसरातील प्रजिमा 76 ते बनकरवाडी रस्ता (1.250 कि.मी.), रामा 23 ते रामवाडी रस्ता (2.00 कि.मी.), तसेच मुळा विभागातील रामा 23 ते चैतन्यपूर भक्ताचीवाडी रस्ता (4.950 कि.मी.) व रामा 23 ते कन्हेर ओहळ रस्ता (2.010 कि.मी.), अशा चारही रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे मंजूर झाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रस्ते विकास कामांसाठी सात कोटी 35 लाख 59 हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच या रस्त्यांच्या कामांची पाच वर्षांसाठी नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी 37 लाख 33 हजार रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आला आहे, असेही आ. पिचड म्हणाले.

सदर रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होण्यासाठी प्रस्ताव दाखल करुन शासन दरबारी पाठपुरावा केला. याच रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळण वाढून तालुक्‍यातील एसटी महामंडळाच्या बसही वेळेवर गावांमध्ये पोहचून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व आरोग्याच्या सुविधा वेळेत मिळण्यास मदत होईल. एकूणच तालुक्‍याच्या विकासाला गती मिळेल व तालुक्‍यातील सर्व गावे पक्‍क्‍या रस्त्यांनी जोडण्याचा आपला मानस आहे. लवकरच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील रस्त्यांना मंजुरी मिळण्यासाठी आपण पाठपुरवठा करणार असल्याचे आ. पिचड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)