नगर : स्थानिक गुन्हे शाखेचा “डबल धमाका’

वेगवेगळ्या कारवाईत लूट आणि दरोड्यातील आठ जण जेरबंद

नगर  – स्थानिक गुन्हे शाखेने आज दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये नऊ जणांना जरेबंद केले आहे. यात विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. भाडेतत्त्वावर मोटारगाडी घेऊन जाऊन ती जबरदस्तीने चोरी करणारे चौघे आणि एक विधी संघर्षित बालक, अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या कारवाईत स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून दरोडा टाकणाऱ्या श्रीगोंदे व नगरमधील चौघांच्या टोळीला अटक केली आहे. या दोन्ही कारवाईत 3 लाख 17 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली आहे.

सोमनाथ रामभाऊ मांडगे ऊर्फ भावड्या (वय 32, रा. पिंप्री गवळी, ता. पारनेर), रमेश बाळू पवडळ (वय 22, रा. निमगांव धावडी, ता. खेड, जि. पुणे), विशाल रघुनाथ जाधव (वय 30, रा. घारगांव, ता. श्रीगोंदे) व स्वप्नील सुभाष रायकर (वय 25, रा. धामणे, ता. खेड, जि. पुणे) या चौघांसह एक विधी संघर्षित बालक, असे पाच जणांना जबरी चोरी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

गजानन मुळे (रा. जालना) यांची या मोटारगाडी भाडेतत्त्वावर ठरवली होती. पुणे ते रांजणगाव गणपती, असा हा प्रवास होता. चालकाला चाकुचा धाक दाखवून भावड्या, रमेश व विधी संघर्षित बालक, अशा तिघांनी जणांनी मारहाण केली. मोटारगाडीती सिटीमध्ये डांबून ठेवून चालकांच्या अंगावर कपडे काढून घेतले. हे कपडे नंतर जाळून टाकले. चालकाला सोडून देऊन मोटारगाडी, मोबाईल आणि रोख रक्कम, असा ऐवज या तिघांनी जणांनी लुटला होता.

गजानन मुळे यांनी या प्रकरणी सुपे (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा समांतर तपास केला. ही लुटमार पारनेरमधील भावड्या याने केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला सणसवाडी (जि. पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. भावड्याबरोबर रमेश पडवळ आणि एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. विधी संघर्षित बालकाने गुन्ह्याची माहिती दिली.

त्यानुसार विशाल जाधव व स्वप्नील रायकर या दोघांनी चोरीच्या गुन्ह्यातील मोटारगाडी विक्री करण्याकरीता टीटी फॉर्मद्वारे बनावट कागदपत्र तयार केले होते. पोलिसांनी मोटारगाडी, मोबाईल असा एकूण 3 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे येथील रमेश पडवळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुण्यातील वडगाव येथील पोलीस ठाण्यात तीन, घारगाव, तळेगाव दाभाडे, शिरूर व पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. एकूण सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

स्वस्तात सोने देण्याच्या अमिषाने गुजरात येथील व्यापारी मीनल रमेश परमार यांच्यावर दरोडा टाकणाऱ्या श्रीगोंदे व नगरमधील चौघांच्या टोळीला अटक केली आहे. पिंट्या भास्कर काळे (वय 35), सुनील भास्कर काळे (वय 50, दोघे रा. कोरेगांव, ता. श्रीगोंदे), मंगेश संजय चव्हाण (वय 21) व वाल्मिक संजय चव्हाण (वय 18, दोघे रा. गुंडेगाव, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मीनल परमार यांना फोन करून आरोपींनी संपर्क साधला होता. स्वस्तात सोने देतो, असे सांगून त्यांना श्रीगोंद्यातील चिखली शिवारात लुटले होते. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 72 हजारांचा ऐवज या चौघांनी जबरीने चोरून नेला होता. या दरोड्यातील आरोपी चिखली शिवारातील साकळाई मंदिर परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तिथे छापा घालून या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)