ट्रक व दुचाकीच्या अपघात एक ठार

file photo

संगमनेर – तालुक्‍यातील मांडवे बुद्रूक शिवारातील मुळा नदीवरील पुलाजवळ ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी ( दि.26) सकाळी दहाच्या सुमारास झाला. घटनेनंतर अज्ञातांनी हा ट्रक पेटवून दिला.

शरद मच्छिंद्र डोलनर (वय 25, रा. मांडवे बुद्रूक) असे या तरुणाचा या अपघात मृत्यू झाला. तर विठ्ठल नामदेव बाचकर (वय 25) हा तरुण जखमी झाला. तालुक्‍यातील एका साखर कारखान्याकडे जाणारा रिकामा उसाच्या ट्रक मांडवे खुर्द पुलाच्या अलीकडे आला असता ट्रक व मोटारसायकलची जोराची धडक झाली. ट्रक भरधाव वेगाने जात होता. ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. दरम्यान जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले. बऱ्याच वेळ आग विझविण्याचे काम सुरु होते. मात्र ट्रक आगीत जळून खाक झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)