वीज बिलाची माहिती आता एसएमएसद्वारे मिळणार

तालुक्‍यात 83 टक्के ग्राहकांच्या मोबाईल नोंद

तालुक्‍यात कृषीपंपधारक वगळता एकूण 18 हजार 914 वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 15 हजार 768 वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलची नोंद केली आहे. तर 13 हजार 611 कृषीपंपधारकांपैकी 1 हजार 481 जणांनी मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. उर्वरित वीज ग्राहकांनी आपापल्या मोबाइल क्रमांकाची नोंद करून घ्यावी, असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड – वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या युनिटची माहिती आतापर्यंत मीटर रिडिंगचा फोटो काढून दिली जात होती. आता 1 फेब्रुवारीपासून वीज बिलावर मीटर रिडिंगचा फोटो येणार नसून, एसएमएसद्वारे सर्व माहिती मोबाईलवर देण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणने मोबाईल नंबरची नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. तसेच एसएमएस दाखवून वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आता मोबाईल ऍपद्वारे रिडिंग घेतली जाणार असून, रिडिंगचा फोटो वीज बिलावर येणार नाही. यामुळे ग्राहकांना लगेच आपले मीटर रिडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होईल. तसेच मीटर रिडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्‍य होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मीटर रिडिंग घेण्यासाठी एक व्यक्ती नेहमीप्रमाणे ग्राहकांच्या घरी जाणार. मोबाईल ऍपद्वारे तो रिडिंग घेणाऱ्या सर्व्हरद्वारे रिडिंग ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. यानंतर रिडिंगनुसार बिलाच्या रकमेचा, अंतिम तारखेचा आणि अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी रिमाइंड एसएमएस, बिल भरल्यानंतरचा एसएमएस, बिल न भरल्याचा एसएमएस, रिडिंग न घेतल्याचा एसएमएस आदी सविस्तर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे उपलब्ध होणार आहे. जर कोणाला आपल्या मीटर रिडिंगचा फोटो पाहावयाचा असल्यास चालू महिन्याचा बिलाचा फोटो महावितरणाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय होणार आहे. बिल दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)