बोल्हेगावच्या युवकाला दुचाकी चोरीत अटक

नगर – शहरात होत असलेल्या दुचाकीच्या चोरींना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने काहीसे लक्ष घातल्याचे दिसत आहे. स्थानिक गुन्हे शाखेला काहीसे यात यश देखील येताना दिसत आहे. सारसनगरमधून चोरीलेला गेलेल्या 55 हजारांच्या दुचाकी चोरीत बोल्हेगाव येथील गणेश भगवान कुऱ्हाडे (वय 21) या युवकाला अटक केली आहे.

रवींद्र नलवडे (रा. सारसनगर) यांची दुचाकी गणेश याने 28 नोव्हेंबरला चोरली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना या चोरीत बोल्हेगावमधील गणेश असल्याची माहिती मिळाली होती. गणेश हा एमआयडीसीतील सह्याद्री चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तिथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. गणेश याने पोलिसांच्या चौकशीत रवींद्र नलवडे यांची चोरलेली दुचाकी आणि शिरूर येथून चोरून आणलेले आणखी एक दुचाकी, अशा दोन दुचाकी काढून दिल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. गणेश कुऱ्हाडे याला कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)