विळदमधील मजुराचा अपघातात मृत्यू

file photo

नगर – दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नी आणि मुलीला समोरून येणाऱ्या टेम्पोंने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. राजेंद्र लक्ष्मण निकम (वय 35, रा. विळद) असे मयत झालेल्याचे नाव आहे. राजेंद्र यांची पत्नी सविता यांच्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

राजेंद्र, त्यांची पत्नी सविता निकम त्यांच्या मुलीला घेऊन दुचाकीवरून चालले होते. निंबळक रोडवरील सनफार्मा चौकात समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील निकम कुटुंब रस्त्यावर पडले. राजेंद्र निकम यांना गंभीर दुखापत झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालकाने जखमी निकम कुटुंबियांना मदत न करता तेथून निघून गेला. राजेंद्र यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी सविता व मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)