गोवंशांची कत्तल करणारी श्रीगोंद्यातील टोळी हद्दपार

दोन वर्षासाठी कारवाई : पाच जणांची टोळी

नगर – गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करणारी श्रीगोंद्यातील टोळीला दोन वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हादंधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्यानुसार ही कारवाई करत हा आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ केली आहे.

टोळीप्रमुख अतीक गुलामहुसेन कुरेशी (वय 30, रा. कसाईगल्ली), अन्वर गुलाब सय्यद (वय 35, रा. शनीचौक), मुंतजर इसाक कुरेशी ऊर्फ रमजू (वय 26, रा. श्रीगोंदे एसटी बसस्थानकाजवळ), मुनाफ गुलाम हुसेन कुरेशी (रा. कसाईगल्ली), बाबू आशपाक कुरेशी (वय 23, कसाईगल्ली, सर्व रा. श्रीगोंदे) या पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

अवैध मांस विक्री करणे, गोवंश जातीचे जनावारांची कत्तल करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, खंडणी उकळणे, चोरी करणे, अपहरण करणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, जबरी चोरी, अग्नीशास्त्राचा बेकायदेशीर वापर करणे आदी गंभीर गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल आहेत. सुमारे नऊ गुन्हे या टोळीविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)