अपघातग्रस्त शेतकऱ्याला मंत्री महाजनांचा मदतीचा हात

नगर – नगर-औरंगाबाद रस्त्यावर पांढरीपुलाजवळ झालेल्या अपघातग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला स्वत:च्या गाडीतून त्यांनी रुग्णालयात आणून दाखल केले.

गिरीश महाजन हे आज (शुक्रवारी) औरंगाबादवरून नगरकडे येत असताना पांढरीपूल (ता. नगर) येथे एका व्यक्तीचा अपघात होऊन जखमी अवस्थेत पडली होती. बघ्यांची गर्दी खूप झाली होती. ही गर्दी पाहून जलसंपदा मंत्र्यांनी त्यांचा ताफा थांबवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गिरीश महाजन यांनी इतरांच्या मदतीने जखमीला उचलून स्वतःच्या गाडीत घेतले व त्याला उपचारासाठी नगरला हलविले. त्यानंतर ताफ्यातील दुसऱ्या वाहनातून ते स्वत: राळेगणसिध्दीकडे रवाना झाले. अपघातग्रस्त व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)