शेवगाव नगरपालिकेची मतदार जनजागृती मोहीम

शेवगाव- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे तसेच त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या 73 व 74 व्या घटनादुरुस्तीचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा यासाठी शेवगाव नगरपालिकेने जनजागरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली.

शेवगाव नगरपालिकेच्या अध्यक्षा राणीताई मोहिते, उपाध्यक्ष वजीर पठाण यांचे उपस्थितीत 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेऊन घ्यावा यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)