कनोली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

संगमनेर – कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरात विष पिवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.24) संगमनेर तालुक्‍यातील कनोली येथील बागायत पट्ट्यात समोर आली आहे. दत्तात्रय नानासाहेब वर्पे (वय 38) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी वर्पे यांच्या पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेल्या असता घरात कोणी नसल्याचे बघून त्यांनी विष प्राशन केले. वर्पे यांच्या पत्नी घरी आल्या असता त्यांना औषधाचा वास आल्याने त्यांनी शेजारी राहत असलेल्या सासऱ्यांना ही माहिती दिली. वर्पे यांना संगमनेर येथे उपचारासाठी हलविले, मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)