सर्जेपुरात गॅस गिझरच्या स्फोटात तीन जखमी

नगर – सर्जेपुरा येथे घरात वापरण्यात येणाऱ्या गॅस गिझरचा स्फोट झाल्याने दोन मुले आणि एक महिला, असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. असीम इब्राहीम शेख, शफिया शेख व ओवेस शेख असे स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी मध्यरात्री हा स्फोट झाल्याने शहरात अफवा सुरू झाल्या होत्या. परंतु हा स्फोट गॅस गिझरचा असल्याचे स्पष्ट झाले.

सर्जेपुरा येथील व्हिसेनपुरा परिसरात असीम शेख यांचे घर आहे. मंगळवारी रात्री शेख कुटुंब घरकाम उरकल्यानंतर झोपण्याच्या तयारीत होते. पाणी तापविण्यासाठी घरच्यांनी गॅस गिझर बसविलेले आहे. घरातील एक व्यक्ती गॅस गिझरच्या ठिकाणी केली होती. तिचा या गिझरला धक्का लागला. यातच गॅस गिझर सुरू झाले. ते कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने या गॅस गिझरचा मोठा स्फोट झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्फोट एवढा मोठा होता की, घराचे छत उडाले, तर भिंत कोसळली. स्फोटाच्या आवाजाने सर्जेपुरातील नागरिकांनी शेख यांच्या घराकडे धाव घेतली. जखमी झालेले शेख यांच्या कुटुंबियांतील तिघांना रुग्णालयात हलविण्यात आले. तोफखाना पोलिसांनी देखील स्फोटाच्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. स्फोट नेमका कशाचा होता, याची खातरजमा केली. तोफखाना पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)