न्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे

कोपरगाव – येथील न्यायालय इमारत जुनी झाली आहे. त्याजागी लवकरच नव्या न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे. ही इमारत होईपर्यंत येथील दिवाणी वरिष्ठ व कनिष्ठ स्तर अशी पाच न्यायालये जिल्हा न्यायालय स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या व आवश्‍यक दुरूस्ती कामास शासनांच्या विधी व न्याय विभागाने 66 लाख 65 हजार रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

याबाबत शासन आदेश कार्यासन अधिकारी सं. सं. नवगिरे यांनी 11 जानेवारी रोजी काढला असून उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय यांचे पत्र व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचे अंदाजपत्रके तयार केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन न्यायालयाची इमारत तयार होण्यापूर्वी कनिष्ठ स्तरावरील तीन दिवाणी न्यायालय, व वरिष्ठ स्तरावरील दोन दिवाणी न्यायालय अशी पाच न्यायालये जिल्हा न्यायालय येथे स्थलांतरीत करावी लागणार आहे. त्यासाठी 62 लाख 60 हजार 100 रूपये प्रशासकीय खर्च येणार आहे. त्यास विधी व न्याय विभागाने ही मान्यता दिली आहे.

त्यात स्थलांतरणांसाठी 50 लाख 98 हजार 262 रूपये, लेबर फर्निचर खर्च 1 लाख 50 हजार, विद्युतीकरणासाठी 4 लाख व जीएसटी 10 लाख 16 हजार 687 रूपये अशा 66 लाख 65 हजार रूपये अंदाजपत्रकीय खर्चाचा समावेश आहे. असे आ. कोल्हे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)