निमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा

file photo

नगर – नगर तालुक्‍यातील निमगाव वाघा येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत गुरुवार दि.17 जानेवारी रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. नेहरु युवा केंद्र संलग्न श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे व स्व.पै.डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.

या स्पर्धेत 13 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्या ठरणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संघास स्मृतीचिन्ह तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना नेहरु युवा केंद्राच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)