स्वच्छ भारत सर्वेक्षणात कर्जत नगरपंचायत अग्रेसर राहील- राऊत

कर्जत – देशभर स्वच्छ भारत सर्वेक्षण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो महत्वकांक्षी प्रकल्प आहे. कर्जतमध्ये स्वच्छ भारत अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविले जात आहे. सर्वेक्षणात कर्जत नगरपंचायत अग्रेसर राहील, असा विश्वास उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी व्यक्त केला. नगरपंचायतीत स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 या अभियानात कर्जत नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या घंटागाड्या नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा जमा करत आहेत. तसेच नगरपंचायतीने सुरूवातीपासून स्वच्छतेची काळजी घेतली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. शहर हागणदारीमुक्त झाले आहे. नगरपंचायत हद्दीतील ओला व सुका कचरा वेगळा जमा करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. नगरपंचायतीच्या वतीने जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालय,माध्यमिक विद्यालय तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. शहरात सुमारे 11 हजार विद्यार्थी आहेत. त्यांना या अभियानाची माहिती दिली जाणार आहे.

ग्लोबल शोल्युशन या संस्थेचे समन्वयक कैलास मोरे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, ज्येष्ठ पत्रकार भरत वेदपाठक, अमरनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक नाना बेद्रे, समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक युसूफ शेख, मुख्याध्यापक संतोष खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, सुधाकर समुद्र, अनिल गदादे, वृषाली पाटील, निता कचरे, हिरामण येळपनेकर, संजय शिंदे, उद्धव थोरात, कार्यालय प्रमुख संतोष समुद्र आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)