पार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा

कोपरगाव – शिर्डी नगरपंचायतीने पार्किंगचा ठेका दिला असून, या ठेकेदाराकडून कोपरगाव येथील रिक्षा व मिनिडोअर चालंकाकडून 50 रुपये पार्किंग शुल्क वसूल केला जातो. तो तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोपरगाव रिक्षा संघटनेने दिला आहे.

हे पार्किंग शुल्क रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व रिक्षा चालकांनी शिर्डी नगरपंचायतीवर मोर्चा नेला होता. त्यानंतर तात्पुरती वसुली बंद झाली होती. मात्र 7 डिसेंबरपासून ही वसुली पुन्हा सुरू झाली आहे. ही वसुली बंद न झाल्यास नगरपंचायतीवर मोर्चा नेऊ, असा इशारा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साईभक्‍त मंदिराजवळ उतरतात. त्यांना थोडा वेळ लागतो. तेवढ्यात तेथे पार्किंग ठेकेदाराची माणसे येतात व पावत्या देतात. तसेच रिकाम्या मिनिडोअर रस्त्यावर थांबवून 50 रुपयांची पार्किंग पावती रिक्षा चालकांच्या अंगावर फेकून जबरदस्तीने वसूल केली जाते. यात रिक्षा चालक व ठेकेदाराची माणसे यांच्यात वाद होतात. तेंव्हा तातडीने ही बेकायदा वसुली बंद करावी, असेही पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)