सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख

संग्रहित छायाचित्र

देवगाव – सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा करणाऱ्या सकारच्या डोळ्यात पाणी शेतकरीच आणणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. नेवासा तालुक्‍यातील शहापूर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करतांना गडाख बोलत होते.

गडाख म्हणाले, शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तुटपुंजी अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे. कांदयाच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने तालुक्‍यातील सर्वच शेतकरी हतबल झाले आहेत. बाजारात मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात पाटपाण्याचेही नियोजन होत नाही, शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असून लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याची टिका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.

याप्रसंगी सरपंच नारायण कोलते, गोरक्षनाथ देवकर, माणिक कोलते, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब मांडे, प्रभाकर कोलते, संजय कोलते, ज्ञानदेव कोलते, जनार्धन देवकर, अशोक शिंदे, संजय देवकर, सिताराम शिंदे, संजय वाल्हेकर, शिवाजी कोलते, नामदेव कोलते, उत्तम कोलते, बाळासाहेब लिंगायत, ईश्वर उगले, शिवाजी गुळवे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)