आ. पिचडांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

सुपारी घेऊन भोर यांचे आंदोलन

संजीव भोर यांनी युटेक साखर कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोलेंची सुपारी घेऊन पिंपळगाव खांड धरणाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर नेण्यासाठी आंदोलने केली.जलसंपदानेही पाण्याचे नियोजन चुकवल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नाही, असा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी केला.

अकोले  – अकोले तालुक्‍यातील पिंपळगाव खांड धरणातून काही दिवसांपूर्वी आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र हे आवर्तन धरणाचे लाभक्षेत्र सोडून खाली सोडल्यानंतर मुळा परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठा संघर्ष उभा राहिला. यानिमित्ताने मुळा परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्यासंदर्भात समस्या जाणून घेण्यासाठी आ. वैभव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी मुळा परिसरातील गावांमध्ये दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देऊन यापुढील पाणी संघर्षासाठी मोठी ताकद उभी करण्याचे आश्‍वासन आ. पिचडांना दिले.

यावेळी चासमध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी गायकर होते. अगस्ती कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसेक्रेटरी भाऊसाहेब गोडसे, सरपंच बाळासाहेब शेळके यांनी परिसरातील पाणीप्रश्नाबरोबरच इतर समस्यांवर आपल्या भाषणामधून आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी आ.पिचड म्हणाले, पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे हे पहिलेच आवर्तन होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज नव्हता. माणुसकीच्या नात्याने यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले. यापुढील काळात सौजन्याची भूमिका न घेता पाण्याचा एक थेंबही लाभक्षेत्राखाली जाऊ देणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी उपसरपंच बी. एम. शेळके, सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेळके, शांताराम शेळके, आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, मारुती शेळके, सोपान शेळके, मुक्ताभाऊ वाडेकर, नवनाथ पवार, औदुंबर पवार, भाऊराव गोडसे, संदीप वाडेकर, विक्रांत शेळके, रोहिदास शेळके, कैलास शेळके, गोपीनाथ शेळके, गोरक्ष कहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन शेळके यांनी केले, तर आभार भागवत वाडेकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)