शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी न देता केली चेष्टा – रोहित पवार

शिंपोरे (ता. कर्जत) - येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना रोहित पवार समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा शेतकरी मेळावा

कर्जत – मतदारसंघातील पालकमंत्र्यांनी स्वतःची लाडूतुला करून घेतली. मात्र ते दिलेले शब्द पाळत नसल्याने, त्यांचं लाडुतुलेएवढंही वजन राहिलेलं नाही. पक्षाच्या स्टेजवर शेतकऱ्यांचे कर्जमाफी दिल्याचे फोटो काढून, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी न देता त्यांची चेष्टा केली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जत तालुक्‍यातील शिंपोरे येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. औटेवाडी, खेड, वायसेवाडी, आखोणी, बाभुळगाव, मानेवाडी, शिंपोरे, राशीन या गावांतील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले. पवार पुढे म्हणाले, मंत्र्यांनी जनावरे पाहुण्यांकडे सोडायला लावली तर, भाजपच्या इतर नेते-मंत्र्यांनी वेगवेगळी विधाने करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे त्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीतून मतदानातून जागा दाखवून द्या.
मंत्र्यांनी लाडूतुला केली, ते घोड्यावरही बसले त्यांनी पुन्हा लग्न केलं की काय? अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली.

यावेळी रामचंद्र खराडे, ऍड. दत्ता चव्हाण आदिंनी या भागातील प्रश्न मांडत रोहित पवार यांचा गावोगावी वाढत असलेला जनसंपर्क आगामी निवडणुकीचेच संकेत देतो. त्यामुळे या मतदार संघात राम शिंदे यांच्या विरुध्द रोहित पवार अशी लढत पहावयास मिळेल असेच चिन्ह दिसत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी सोलापूरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, कर्जत-जामखेडचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ, कपिल पवार, संजय कोळगे, राजेंद्र गुंड, आण्णासाहेब मोरे, हेमंत मोरे, काकासाहेब तापकीर, शहाजी राजेभोसले, विजय मोढळे, शाम कानगुडे, संध्या सोनवणे, रजनी निंभोरे, ऍड. सुरेश शिंदे, रवींद्र पाडुळे, रामचंद्र खराडे, निलेश निकम आदी उपस्थित होते. शरद खराडे यांनी सूत्रसंचलन केले. अजिंक्‍य मोहिते यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

  1. घेतलेलं कर्ज हे फेडण्यासाठीच घेतलेलं असत, बुडविण्यासाठी नसते किंवा कर्जमाफी व्हावी म्हणून घेतलं जाऊ नये।
    कर्जमाफी मुळे कर्ज फेडण्याची कुवत असून देखील कर्ज न फेडण्याची मानसिकता होत आहे, जे कि अर्थव्यवस्थाच कोलमडून टाकणारी आहे।
    कर्जमुक्ती हा कांही उपाय नाही,
    कर्ज फेडण्याची कुवत निर्माण व्हावी या दृष्टीनं प्रयत्न व्हावे लागतील, त्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालास चांगला भाव यावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत नुसते अनुदान देऊन भागत नाही, शेतकऱयांचा मालास येथे कमी भाव लागत असेल तर परदेशात सुलभरीतीने विक्री व्हावी म्हणून निर्यात परवाने द्यावेत।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)