13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे

File Photo

सुपा – आज महाराष्ट्रामध्ये 13 कोटी वृक्षलागवडीच्या नावाखाली सरकारकडुन पुर्वनियोजीत घोटाळा झाल्याचे जनतेला लक्षात येत आहे. महाराष्ट्रात 13 कोटी वृक्षलागवडीची मोठी जाहीरात मोठा खर्च करुन सरकारकडुन करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात 13 कोटी रोपे तयार करण्यापासून लावण्यापर्यंतचा खर्च मोठा आहे. आज एवढी झाडे लावण्याचा दिखावा याठिकाणी झाला परंतु प्रत्यक्षात झाड जगवण्यासाठी प्रशासणाच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यात गेला आहे. याठिकाणी प्रत्यक्षात एवढी झाडे जगवता येत नसतील तर, हा एवढा खर्च करण्यामागे पुर्वनियोजीत घोटाळा असल्याचे लक्षात येत आहे. प्रशासणाने जबाबदारीने जनतेच्या पै-पैचा हिशोब जनतेला द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली आहे.

निसर्गावर प्रशासणाच्या नाकर्तेपणामुळे जनतेला नैसर्गिक नव्हे तर, मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. आज वनविभागाकडून दुष्काळात वन्य प्राण्यांसह वनस्पती रक्षणाचे नियोजन होताना दिसत नाही. प्रशासणाने वनविभागाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये दुष्काळाच्या आव्हाणाला सामोरे जाण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. आज निसर्गावर झालेल्या आक्रमणामुळे अनेक पशु-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे निसर्गाच्या कालचक्रामध्ये बदल घडून दुष्काळाबरोबर मोठी नैसर्गिक हानी झाली आहे. त्याचा त्रास मानवजातीबरोबर वन्यजीवांनासुद्धा भोगावा लागत आहे. त्यासाठी वनविभागाने याला गांभिर्याने घेवून तत्काळ वनक्षेत्रामध्ये वण्यप्राण्यांना पाणी नसल्यामुळे अनेक वन्य पशु पक्ष्यांबरोबर हिंस्त्र प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीत येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक प्राणी रस्त्यावर येतात, त्यांचा अपघातात मृत्यु होणाऱ्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वन्य क्षेत्रामध्ये ज्याठिकाणी पानवठे आहेत, त्या ठिकाणी वनविभागाने पाणवठ्यात पाणी भरुन ठेवावे व ज्या ठिकाणी वन्य प्राणी असुनसुद्धा पानवठे नाहीत, अशा ठिकाणी तत्काळ वन्य प्राण्यासांठी जबाबदारीने पानवठे बनवणे गरजेचे असुनसुद्धा वनविभाग स्थूल असल्याचे चित्र जनतेला दिसत आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांनी या दुष्काळाला गाभिर्याने घेवून तत्काळ प्रत्येक वनविभागाच्या कार्यालयात कामाचे नियोजन करुन, कामाचे रजिस्टर बनवून गावोगावच्या वनक्षेत्राची दखल घ्यावी व जनतेच्या निसर्गाच्या सेवेला सार्थ ठरावे ही अपेक्षातरी जनतेने प्रशासणावर अवलंबून न राहता आपापल्यापरिने निसर्ग रक्षाणाच्या कार्याला हातभार लावणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

निसर्गावर आक्रमण करुन नका, नविन अवणी बनवू नका. निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे आज अवणीचा बळी गेला, अवणी वाघिणीला बेशुद्ध करुन तिला योग्य ठिकाणी ठेवता आले असते, तिच्याबरोबरच तिच्यापासून निर्माण होणारी उत्पत्ती आज थांबवली. निसर्गाच्या कालचक्रात केलेला हस्तक्षेप घातक असल्याचेही पवळे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)