राक्षसवाडी खुर्दला होणार पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राक्षसवाडी खुर्द येथील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला, जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडवले, श्री क्षेत्र बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी नुकताच पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज कोपनर यांच्या पुढाकारातून राक्षसवाडी खुर्द येथे पालकमंत्री शिंदे यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विजय पावणे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. त्यांच्या विकासाच्या झंझावातामुळे ठिकठिकाणी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राक्षसवाडी खुर्द ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने लवकरच या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीसाठी धनराज कोपनर, सरपंच रावसाहेब काळे, दादा काळे, देविदास कोपनर, रामदास कारंडे, बाळासाहेब काळे, अंकुश कोपनर, नामदेव रुपनर, अल्लाउद्दीन शेख, नामदेव कोरडकर, मच्छिंद्र अस्वले, जयसिंग कोरडकर, अनील देवकाते आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)