दुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी

नगर-मनमाड महामार्गावरील साईधाम पाटीजवळील घटना

कोपरगाव – शहरातील नगर-मनमाड महामार्गावर साईधाम येथे दुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्‍वर उत्तम देवकर (वय 35) व अश्‍विनी ज्ञानेश्‍वर देवकर (दोघे रा.टाकळी ता. कोपरगाव) हे पती-पत्नी कोपरगाव येथे खासगी रूग्णालयात गेले होते, मात्र दवाखाना बंद असल्यामुळे घराकडे परत जात असताना नगर मनमाड महामार्गावर साईधाम पाटी जवळ गणेश लहानू बर्डे (वय 32, रा.टाकळी) याने देवकर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने देवकर पती-पत्नी रस्त्यावर कोसळून अपघात घडला.

यामध्ये अश्‍विनी यांच्या पोटात जोराचा मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर गणेश लहानू बर्डे यांच्या डोक्‍याला जोराचा मार लागून गंभीर दुखापत झाल्याने बेशुध्द झाला. दोघांनाही कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. कुंदन गायकवाड यांनी प्रथोमपचार केले.

दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गणेश बर्डे यांना लोणी येथील रूग्णालयात, तर अश्‍विनी यांना कोपरगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये ज्ञानेश्‍वर देवकर यांनाही खरचटल्याने हाता- पायाला दुखापत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)