डॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक

12 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोपरगाव – शहरातील गांधीनगर भागात राहाणाऱ्या एका डॉक्‍टर असलेल्या युवतीला महेश संजय सूर्यवंशी याने नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे भासवून लग्न केले. मात्र हा बनाव लक्षात आल्याने फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत डॉ. मयुरी महेश सूर्यवंशी (वय 27, रा. गांधीनगर, कोपरगाव) यांनी महेश संजय सूर्यवंशी, संजय शिवराम सूर्यवंशी, शोभा संजय सूर्यवंशी, शिवराम श्‍यामराव सूर्यवंशी, विमलबाई शिवराम सूर्यवंशी, ललित संजय सूर्यवंशी (सर्व रा. तळवाडे, ता. मालेगाव, जि. नाशिक), ज्योती तुषार पाटील, तुषार भास्कर पाटील (रा. नाशिक), मोठाभाऊ त्र्यंबक सूर्यवंशी (रा.खालप, ता. मालेगाव), मधुकर त्र्यंबक पाटील (रा. रावळगाव, ता. मालेगाव), तुषार मधुकर पाटील (रा. चिरई, ता. मालेगाव), प्रिया तुषार पाटील (रा. रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयुरी सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आरोपी महेश सूर्यवंशी हा डॉक्‍टर आहे व तो नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे खोटे सांगून साखरपुडा व लग्न केले. साखरपुड्यात व लग्नात दिलेल्या भेटवस्तू व संसारोपयोगी सामान स्वीकारुन फसवणूक केली. याप्रकरणी 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार आर. बी. भालेराव पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)