मला पक्ष बदलण्याची गरज नाही – आ. मुरकुटे

नेवासे – सोशल मीडियावर आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय बदनामी करणारे मेसेज फिरत असल्याने तालुक्‍यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिलेली माहिती अशी की, एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नेवासे दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत करत सत्कार केला होता. आता तोच फोटो व मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत असून यामध्ये काहीही तथ्य नसून हा प्रकार मला राजकीयदृष्ट्या बदनाम करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मला पक्ष बदलाची गरज नसून माझ्या विरोधकांनाच अजून पक्ष नसल्याने तेच वाऱ्यावर आहेत आणि माझ्या पक्ष बदलाच्या बदनामीकारक पोस्ट टाकत आहेत. मी भाजपचा असून मी भाजपतच आहे, माझा तालुक्‍यात वाढलेला जनसंपर्क, तालुक्‍यात झालेला विकास यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बदनामी करणाऱ्या व मेसेज व्हायरल करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)