सावेडी शहर झाले, हवे आणखी एक पोलीस ठाणे

गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक रेशो 650 च्या आसपास; दोन वर्षांपूर्वीच्या प्रस्तावावर साचली धूळ


-प्रदीप पेंढारे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – जिथे उच्चभ्रू वसाहतींचे नागरीकरण जास्त, तिथे गुन्हेगारी जास्त! सावेडीचा विचार केल्यास, हे शहरालगत वाढणारे उपनगर! उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या रहदारीने या उपनगराचे कधी शहर करून टाकले आहे, हे देखील लक्षात आलेले नाही. सावेडीतील शहरीकरणाची झपाट्याने होत असलेल्या वाढीत गुन्हेगारी देखील तेजीने फोफावत आहे.

जबरी चोरी, लूट, घरफोडी, खून, दंगे, अशा गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक रेशो 650 च्या आसपास आहे. त्यामुळे एकट्या तोफखाना पोलिसांनी सावेडीतील गुन्हेगारी रोखण्यात दिवसेंदिवस तारेवरची कसरत करावी लागत आहे. केडगाव पोलीस ठाण्याचा जसा स्वतंत्र प्रस्ताव आहे, तसा दोन वर्षापूर्वी वाढत्या सावेडीला आणखी एक स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

सावेडी उपनगर हा उच्चभ्रूंसाठी ओळखा जातो. या उपनगरातील कोणत्यातरी कान्याकोपऱ्यात चोरी, घरफोडी ठरलेलीच असते. तशी नोंद देखील तोफखाना पोलीस ठाण्यात होते. भुरट्या चोऱ्यांची नोंद होत नाही, हे विशेष!

धूमस्टाईलने मंगळसूत्र चोरीचे प्रकाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असेल, ती सावेडीतून. प्रशस्त असे रस्ते असल्याने दुचाकीस्वारांना, अशी चोरी सोपी होते. पोलिसांपर्यंत तक्रार येईपर्यंत आणि तेथून पुढे पोलिसांकडून सुरू होणारा आरोपींचा तपास, यात बराच वेळ खर्ची होतो.

परिणामी, चोरापर्यंत पोलीस पोहचेपर्यंत तो “आझाद’ होतो. दोन दिवसापूर्वी याच सावेडी उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यात सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायावर पोलिसांनी छापा घातला होता. हा व्यवसाय उघडकीस आला, म्हणून झाले. जे छुपे व्यवसाय सुरू आहेत, ते वेगळेच!

खबऱ्यांचे जाळे आहे. परंतु कारवाईला वेळ नाही, अशी व्यवस्था पोलिसांची झाली आहे. वाढत्या वसाहतीकरणामुळे खबऱ्यांची माहिती योग्य येईलच, असे नाही. त्यामुळे पोलिसांकडून माहिती काढण्यात सातत्य राहत नाही. परिणामी खबऱ्यांचे जाळे हे कमकुवत झाले आहे.

संपर्काची माध्यमे वाढली आहे. परंतु गुन्हेगारीची पद्धत देखील बदलली आहे. त्याचाही परिणाम गुन्हेगारीवर अंकुश ठेवताना होऊ लागला आहे. सावेडीची वाढते शहरीकरण पाहता दोन वर्षापूर्वी आणखी एक स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव समोर आला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयांमार्फत या प्रस्तावाची फाईल, गृह मंत्रालयापर्यंत गेली आहे. परंतु याच्या पाठपुराव्याला लोकप्रतिनिधींना वेळ नाही, हे दुर्दैव्य आहे. केडगाव पोलीस ठाण्याची फाईलवर जशी धूळ साचून आहे, तशीच सावेडीतील आणखी एका स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या फाईलचे झाले आहे. गंभीर घटना झाल्यावरच या प्रस्तावांची आठवण होते. परंतु पाठपुरावा होत नाही.

“सावेडी हे उपनगर राहिलेले नाही. ते शहर झाले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि विस्तारानुसार गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, पोलीस संख्याबळ वाढवून मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करणार आहे.
– संपत शिंदे, पोलीस निरीक्षक

“सावेडीत 68 वर्षांपासून राहत आहे. सावेडीची शहरीकरण झालेच आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढली आहे. वाढलेल्या चोऱ्या आणि घरफोड्यांमुळे असुरक्षित वाटते आहे. घरात राहिलो किंवा नाही, तरी चोरी होतेच. पोलिसांचे संख्याबळ वाढवले पाहिजे.
– नरेंद्र कुलकर्णी ,सावेडीतील नागरीक

“सावेडीत 40 वर्षांपासून राहत आहे. सावेडी ही उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखले जाते. गुन्हेगारी वाढली आहे. चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहे. पोलिसांकडून देखील चोऱ्यांची उकल होताना दिसत नाही. सावेडीला आणखी एका पोलीस ठाण्याची गरज आहे.
– मुकुल गंधे ,सावेडीतील नागरीक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)