भिस्तबाग येथे दिवसा एक लाखाची घरफोडी

नगर – पाईपलाईन रोडवरील भिस्ताबाग येथे चोरांनी दिवसा घरफोडी केली आहे. अविनाश बापूराव आठरे (रा. गणेश विहार, भिस्तबाग चौक) यांच्या फिर्यादीवरून चोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.

चोरांनी आठरे यांचे बंद घराचे कुलूप तोडून तेथून सुमारे 1 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. यात दागिन्यांचा देखील समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आठरे यांच्या घरी लग्न कार्याची लगबग सुरू आहे. त्यातच ही चोरी झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)