काळे महाविद्यालयात डॉ. जयकर व्याख्यानमाला संपन्न

कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.

व्याख्यानमालेचे उद्‌घाटनपर पहिले पुष्प गुंफताना संभाजीराव दरोडे यांनी संत हे चालते बोलते विद्यापीठ’ या विषयावर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. संत चळवळ ही कोणत्याही जातीपातीपुरती मर्यादित नव्हती, तर साऱ्या तळागाळातील समाजाला या चळवळीने कवेत घेतले होते. वारकरी संप्रदायाने अध्यात्मिक स्वातंत्र्य साऱ्यांनाच बहाल केले होते. विश्‍वशांती, विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणारी, समानता प्रस्थापित करणारी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी संतमंडळी ही चालती बोलती विद्यापीठे होती. त्यांच्या विचारांची, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याची आज समाजाला नितांत गरज असल्याचे प्रतिपादन दरोडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ होत्या. मानवतावाद ही संतांची खरी जात, तर दया, क्षमा, शांती हा खरा संतांचा धर्म आहे. एकता व समतेचे तत्व ही संत चळवळीची मोठी देणगी आहे. संतसाहित्यातील संतांचे विचार आजच्या तरुण पिढीने आचरणात आणावेत, असे मत प्राचार्या गुरसळ यांनी व्यक्त केले.

या व्याख्यानमालेत प्रा. स्वाती चौधरी यांनी सावित्रीबाई फुले, तर प्रा. सूर्यकांत गडकरी यांनी सांगा मी कसे जगायचे, या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बहिशाल केंद्र समन्वयक प्रा. विशाल पोटे यांनी केले. प्रा. डॉ. सुनीता शिंदे यांनी आभार व्यक्त केले, तर सूत्रसंचालन सुनंदा कोळपे, साक्षी मेहेरखांब यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)