कुकाण्यात मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक

कुकाणा – मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार नेवासा तालुक्‍यातील कुकाण्यासह तरवडी,आंतरवाली,वडूले येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले.

तहसीलदार सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे. या पद्धतीमूळे मतदाराला आपण केलेल्या मतदानाची पडताळणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे करता येणार आहे. मतदान केल्यानंतर आपण ज्या उमेदवाराला मत दिले त्याचे चिन्ह काही सेकंदात स्क्रिनवर दिसणार आहे व त्याची पावती मशीनच्या खालील ट्रेमध्ये मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मंडलाधिकारी मिलींद जाधव, कामगार तलाठी प्रदिप चव्हाण, ग्रामसेवक रामकिसन बटोळे, माजी सरपंच दौलत देशमुख, कारभारी गोर्डे, उमेश सदावर्ते, बाळासाहेब कचरे भाऊसाहेब फोलाणे, आशामियॉं शेख, बाबुलाल शेख, ईकबाल ईनामदार,  शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र बागडे, काका नरवणे, किरण शिंदे, सचिन गोर्डे, रविंद्र कचरे, किशोर राऊत, आंतवाली येथे चेअरमन सुनिल वाबळे, सरपंच जालिंदर सरोदे, उपसरपंच गणेश वाबळे, मच्छिंद्र शेळके, राजेंद्र वाबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)