शेतीकडे तरुणांनी उद्योग म्हणून पाहावे -आ. थोरात

अकोले – ‘शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतीकडे तरुणांनी उद्योग म्हणून पाहावे. याची सुरुवात या प्रदर्शनातून व्हावी,’ अशी अपेक्षा राज्याचे माजी कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
कळस येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन आ. थोरात यांच्या हस्ते झाले. तेंव्हा ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वैभव पिचड होते. आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, रमेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत कृषी प्रधान देश आहे. पण आज शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बळिराजा आज शेती असूनही कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला आहे. त्याला योग्य मार्गदर्शन देण्याचे काम कळस कृषी प्रदर्शन करत आहे, असे आ. पिचड म्हणाले.

आमदार डॉ. तांबे यांनी देशावर सुलतानी संकट आले आहे, असे या सरकारला मुळीच वाटत नाही. शेतकरीविरोधी धोरण राबवणाऱ्या या सरकारला शेतकरी वर्गाशी काही देणघेणे नाही, अशी टीका केली. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे,तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव, माजी सभापती अंजना बोंबले, कीर्ती गायकवाड, पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे, मीनाताई जगधने, सीता गोंदके, अगस्ती साखर कारखाना संचालक अशोक देशमुख, विष्णू महाराज वाकचौरे, सीताराम वाकचौरे, संभाजी वाकचौरे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्तविक सागर वाकचौरे यांनी केले, तर सूत्रसंचालन दिनेश चव्हाण यांनी केले.आभार गणेश रेवगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)