गुजरातला 56 टीएमसी पाणी देण्याचा घाट

संग्रहित छायाचित्र....

सामंजस्य करार अवलोकनार्थ ठेवण्याची संस्कृती प्रतिष्ठानची मागणी

नेवासा – नदी जोड प्रकल्पाद्वारे पाणी वाटप सामंजस्य करारावर पुढील काही दिवसांत केंद्रीय पातळीवर शिक्कामोर्तब होणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्र-गुजरातमध्ये पाणी वाटप सामंजस्य कराराची शक्‍यता असून, केंद्राने महाराष्ट्राच्या नदीजोड प्रकल्पाला 18 ते 20 हजार कोटी रुपयाचा निधी देण्याच्या बदल्यात 56 टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात असल्याचे घाटत आहे. त्यामुळे शासनाने हा करार लोकांच्या अवलोकनार्थ पाटबंधारे खात्याच्या वेबसाईटवर टाकावा, अशी मागणी कुकाण येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानचे मुकुंद अभंग यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या दमण-गंगा खोऱ्यातील 55 टीएमसी पैकी 35 टीएमसी पाणी, नारपार खोऱ्यातील 37 पैकी 21 टीएमसी पाणी, असे एकूण 56 टीएमसी पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली केंद्र व राज्य स्तरावर चालले आहेत. हा सामंजस करार नाशिक, नगरच्या नागरिकांच्या अवलोकनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या वेब साईट टाकावा. यापूर्वी देखील गुजरातमधील नर्मदा सरोवरासाठी महाराष्ट्राची उपेक्षाच झाली आहे. पुन्हा गुजरातला पाणी देऊन महाराष्ट्र भकास करण्याचे धोरण काही राजकीय मंडळी करीत आहे. त्यास करार होण्यापूर्वीच हरकत घेण्यात यावी.

तत्कालीन जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष माधवराव चितळे यांनी 106 टीएमसी पाणी या ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात कमी पडते. त्यासाठी पश्‍चिमेकडील पाणी पूर्वकडे वळवण्याचा उपाय आहे. करार झाल्यास मुळा, प्रवरा, गोदावरी खोरे, उपखोरे यांना किती टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे, याची आकडेवाडी दोन्ही शासनाने करार होण्याच्या अगोदर घोषित करावी, अशी मागणी अभंग यांनी पत्रकात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)