तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात दत्तवाडी शाळेचे दुहेरी यश

चांदा – नेवासा तालुक्‍यातील चांदा येथील दत्तवाडी शाळेने गणित व विज्ञान प्रदर्शनात दुहेरी यश संपादन केले आहे. नेवासा तालुक्‍यातील तेडकुडगाव येथे झालेल्या 44 व्या गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये दत्तवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने दुहेरी यश संपादन केले आहे.

या शाळेतील शिक्षिका मनीषा एकनाथ लबडे यांच्या शिक्षक गटातून मूल्यशिक्षण सापशिडी या उपकरणास तालुका पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला. या उपकरणाची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. तसेच प्राथमिक विभाग लहान गटामध्ये गणित विषयामध्ये विराज कानिफनाथ अडसुरे व संकेत अनिल डाके यांनी बनविलेल्या मल्टिप्लिकेशन बोर्ड या उपकरणास तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्याध्यापक मिलींद जामदार यांच्यासह सहकारी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)