ज्ञानेश्वर कारखान्याचा ऊस गाळापात उच्चांक

file photo

भेंडे – येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गुरुवारी (दि.10) 7 हजार मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमतेवर 9210 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून एकदिवसीय गाळपात उच्चांक प्रस्थापित केला असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली.

शेवाळे म्हणाले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने आज अखेर 74 दिवसात 5,53,730 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 5,93,950 क्विंटल साखरेची निर्मिती केलेली आहे.सरासरी साखर उतारा 10.83 टक्के आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शखाली साखर कारखाना, डिस्टिलरी, सहविज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जात आहे. ऊसाचे कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने काटेकोर नियोजन केलेले. ऊस गाळापात एकदिवसीय उच्चांक प्रस्थापित केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाने अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी-वाहतुक कामगारांचे कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)