भाऊसाहेब थोरात,अण्णासाहेब शिंदे ग्रामीण विकासाचे शिल्पकार : श्रीनिवास पाटील

जयंती महोत्सवात द्वादशीवार, शिंदे खेमनर यांना पुस्कार प्रदान

संगमनेर – भारत हा कृषिप्रधान देश आहे. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांती आणली, तर भाऊसाहेब थोरातांनी सहकारातून समृध्दी निर्माण केली. सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन जीवन समर्पित केलेले थोरात व शिंदे हे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचे शिल्पकार असल्याचे गौरवौद्‌गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.
स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर खा. दीपेंदरसिंग हुडा, खा. राजीव सातव, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नदीम जावेद, आमदार डॉ. सुधीर तांबे, मा. खा. दादा पाटील शेळके, माजी आ. पांडुरंग अभंग, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, करण ससाणे, रावसाहेब शेळके, पंडितराव थोरात, विजय अण्णा बोऱ्हाडे, उल्हास लाटकर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, इंद्रजित थोरात, शोभाताई कडू, रोहिणीताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यावेळी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार बाजीराव पा. खेमनर यांना प्रदान करण्यात आला. एकावन्न हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह देण्यात आले.

खा. राजीव सातव म्हणाले, भाजपा सरकार ग्रामीण भाग, शेतकरी, सहकार मोडण्याचा डाव करू पाहात आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने देशाची अधोगती होणार आहे.

आमदार थोरात म्हणाले, भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे यांचे विचार पुढच्या पिढींना कळावेत, म्हणून जयंती महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे स्वागत आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रास्ताविक आमदार बाळासाहेब थोरात, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)