शिर्डी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वरिष्ठ लिपिकास झालेल्या मारहाणीचा केला निषेध

शिर्डी – शिर्डी शहरातील पालखी रस्ता ते पिंपळवाडी रस्त्याचे कॉक्रिटिकरण करण्याचे काम सुरू असताना शिर्डी नगरपंचायतीचे मुख्य लिपिक मुरलीधर देसले व नागरिकांत शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसान देसले यांना मारहाणीत झाले. या घटनेच्या निषेधार्थ आज कामगारांच्यावतीने कामबंद आंदोलन केले. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छतेचा बोजवारा उडाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान नगराध्यक्षा योगिता शेळके, ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके आणि उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी आंदोलनकर्त कर्मचाऱ्यांची तत्काळ भेट घेऊन सामजस्याने तोडगा काढीत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सेवा पूर्ववत सुरू केल्या. दरम्यान गुरुवारी शिर्डी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यास मारहाण झाल्याच्या घटनेनंतर शिर्डी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगरपंचायत प्रवेश द्वारासमोर ठिय्या मांडत घटनेचा निषेध केला.

दरम्यान कामगारांना एका आठवड्यात मारहाण झाल्याची ही दुसरी घटना असून, याबाबत कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचा मुद्दा उचलत आरोपींना अटक करण्यात यावी, असे निवेदन शिर्डी पोलिसांना दिल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय सदाफळ यांनी सांगितले. सुमारे 260 कर्मचाऱ्यांनी सकाळपासुन सुरु केलेल्या आंदोलनात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी मध्यस्थी करुन विस्कळीत झालेली आत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवावी, अशी भूमिका घेतली.

यावेळी नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली, तर तीन दिवस आत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवून त्यानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. शिर्डी पोलिसांनी यातील काही महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)