डॉ.कोल्हे दांपत्यासह सयाजी शिंदे, कुमार केतकर कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी

प्रशांत गडाख : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

नगर – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार यंदा मेळघाटातील देवदूत बनलेल्या डॉ.रवींद्र व स्मिता कोल्हे या दाम्पत्याला , त्याचबरोबर अभिनेता सयाजी शिंदे यांना आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना जाहिर झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्य ,शिक्षण, समाजसेवेसाठी डॉ.रविंद्र व स्मिता कोल्हे तर वृक्ष लागवडीसाठी तसेच हिंदी,मराठी, कानडी,व तमीळ चित्रपटातील भरीव कामगीरी साठी सयाजी शिंदे तर मराठी व इंग्रजी पत्रकारीतेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

रविवारी दि.20 रोजी नेवासे तालुक्‍यातील सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख असणार आहेत.यशवंत सामाजिक प्रतिष्ठान च्यावतीने दरवर्षी कृतज्ञता पुरस्कार देण्यात येतात .

यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार , शास्रज्ञ रघुनाथ माशेलकर ,नसिमा हुजरूक, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ.प्रकाश व मंदाकिनी आमटे,डॉ.तात्याराव लहाने, दिग्दर्शक रामदास फुटाणे , नागराज मंजुळे, कवी ना.धो.महानोर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
रविवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)