काळे समिती अहवालाची अंमलबजावणी करा

प्रकल्पग्रस्त कृती समितीची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

अकोले – शंकरराव काळे समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून, त्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अकोले तालुका प्रकल्पग्रस्त कृती समितीने संगमनेर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी समितीचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र डावरे, मधुकर रामचंद्र पिचड, राजू पिचड, त्र्यंबक खाडगीर, चंदर खाडे, मनोहर गवारी, सुदाम भांगरे, मधुकर मुंढे, धोंडू साबळे, पुष्पा भांगरे, भागा मेमाणे, चंदर काठे, गोरख परते, विष्णू मोहंडुळे, पुनाजी देशमुख, नामदेव देशमुख, काळू मोहंडूळे, लक्ष्मण म्हशाळ, भरत लेंडे, धोंडिबा करवर, मच्छिंद्र परते, रामदास पोटकुले, मनोहर गवारी, तुकाराम मुठे, राधाकिसन लगड, नवनाथ जाधव, मारुती गभाले, नाथू भांगरे, कमाजी ढगे, सुनील तळपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून उपसा सिंचन योजना मंजूर केलेल्या आहेत. त्या उभ्या कराव्यात, राजूर-पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करावे, निळवंडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित जमीन तातडीने देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळालेले नाहीत, त्याना ते देण्यात यावेत, त्यांच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात, निळवंडे प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे राहिलेले स्वेच्छा अनुदान त्वरीत वाटप करण्यात यावे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)