दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारावर संक्रांत

file photo

कर्जत- नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रातीचा. महिलावर्गाच्या आवडीच्या या सणाला वाण-खन आणि सौंदर्य उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होत असते.परंतु यंदा पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुळधरण, राशीन, मिरजगाव, माहीजळगाव येथील आठवडे बाजारावर दुष्काळाच्या झळा जाणवल्या. प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचा बाजार गर्दीने फुलून जातो, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा बाजारामध्ये शुकशुकाट जाणवला. दुष्काळामुळे हाताला काम नाही. पैशाची चणचण असताना, सणाची खरेदी करताना मोठी कसरत करताना महिला वर्ग दिसला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)