टाकळीभान परिसरात बिबट्याची दहशत

संग्रहित छायाचित्र...

टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्‍यातील टाकळीभान येथे गुरुवारी (दि.10) राञी वाडगाव रस्त्यावरील पवार वस्ती परिसरात बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला. यामुळे टाकळीभानमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

या परिसरात बिबट्यांचे कायम वास्तव्य असुन, या परिसरातील अनेक शेळ्यांचा व कुञ्यांचा बिबट्याने फडशा पाडलेला आहे. गुरुवारी राञी पवार वस्ती परिसरातील ज्ञानेश्वर सकाहरी पवार यांच्या वस्तीवर रात्री 3 वाजेच्या सुमारास शेळीवर हल्ला करून सुमारे दीड वर्ष वय असलेल्या शेळीचा फडशा पाडला. त्यानंतर वनरक्षक जी.बी. सुरासे यांनी घटनास्थळी येवून पहाणी करुन पंचनामा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खैरी निमगाव येथील पशुवैदयकीय अधिकारी डॉ.कोते यांनी शवविच्छेदन केले. गेल्या काही महिन्यांपासून टेलटॅंक परिसरातील बनकर वस्ती, थोरात वस्ती, कापसे वस्ती, दाभाडे वस्ती, खंडागळे वस्ती परिसरात अनेकांना अंधाराच्या वेळी बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)