शासनाकडून मराठी शाळा वाऱ्यावर – संजय जोशी

अकोले – विद्यमान राज्य सरकार इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर खूष असून, प्राथमिक मराठी शाळा मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडल्या आहेत, असा घणाघाती आरोप हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केला.

अकोले येथे हिंद सेवा मंडळ संचालित ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालक मंदिर यांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभात जोशी बोलत होते. रणजित श्रीगोड, अनिलकुमार देशपांडे, निवृत्त शिक्षिका रेखा धर्माधिकारी, सतीशकुमार बूब, दिलीपकुमार शहा, प्रतिमा कुलकर्णी, प्रा. डी. के. वैद्य, पत्रकार अमोल वैद्य, कल्याण लकडे, सुधाताई देशपांडे, योगेश देशमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोशी म्हणाले, अकोले येथील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब नवले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे चांगले काम आहे. शिवाय इथे त्यांचे सहकारी जी मेहनत घेतात, त्याला तोड नाही. बालक मंदिराला जी जी गरज भासेल, ती गरज भागविण्याच्या दृष्टीने हिंद सेवा मंडळ सहकार्य करील, असे सांगितले.

सुरेखा धर्माधिकारी यांनी ‘मोबाईलचा वाढदिवस’ ही कथा सांगितली. संस्थेचे सतीश बूब, रणजित श्रीगोड, दिलीप शहा, प्रतिमा कुलकर्णी, मोरेश्वर धर्माधिकारी आदींची भाषणे झाली. संस्थेच्या संचालिका सुधाताई देशपांडे यांनी अकरा हजार रुपये व मोरेश्वर धर्माधिकारी यांनी एकवीस हजार रुपये रोख शाळेसाठी मदत म्हणून दिले.

प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब नवले यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली मालवणकर व वसीम शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दिलशाद सय्यद, बाळासाहेब मांडे, स्वाती कोते यांनी करून दिला. आभार योगेश नवले यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)