आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही – नाहाटा

श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने आम्हाला सन्मानाने 20 पैकी पाच जागा दिल्या असून, आमच्या श्रीगोंदा तालुका विकास आघाडीने भाजपसोबत आघाडी केलेली आहे. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आमच्या पाच उमेदवारांना काही तांत्रिक अडचणीमुळे भाजपचे चिन्ह घेतलेले आहे. अशी माहिती आघाडीचे नेते बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.

नाहाटा म्हणाले, आमच्या आघाडीतील नेत्यांना गेली चार वर्षे त्रास देण्याचे काम कॉंग्रेसच्या तालुक्‍यातील काही नेत्यांनी केले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत स्वपक्षाचे आणि मित्र पक्षाचे मिळून नऊ उमेदवार पाडण्याचे काम केले. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मुलाखतीला आम्हाला साधा फोनदेखील केला नाही. आम्हाला निरोपही दिले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)