यांत्रिकीकरणाशिवाय शेतीला पर्याय नाही

File photo

राहुरी विद्यापीठ – आजच्या काळात यांत्रिकीकरणाशिवाय शेती करणे शक्‍य नाही. शेतीतील जवळ जवळ सगळीच कामे यांत्रिकीकरणाने सहज व सोपी झालेली आहेत. शेतीमध्ये मजुरांची समस्या भेडसावत आहे. अशावेळी शेती करताना यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत कृषि यंत्रे व औजारे संशोधन प्रकल्पाच्या 33 व्या वार्षिक़ कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

व्यासपीठावर नवी दिल्लीस्थित भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महानिदेशक डॉ. कांचनकुमार सिंग, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे भोपाळ येथील कृषी अभियांत्रिकी केंद्रीय संस्थेचे संचालक डॉ. कृष्णकुमार सिंग, तामिळनाडू कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिक़ी व संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. सी. दिवाकर दुराईराज, अकोला कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्यंकटराव मायंदे, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, भोपाळ येथील प्रकल्प समन्वयक डॉ. सी.आर. मेहता उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सहायक महानिर्देशक डॉ. कांचनकुमार सिंग यांनी कृषी अनुसंधान परिषद राबवित असलेल्या वेगवेगळ्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी डॉ. सी. दिवाकर दुराईराज, डॉ. व्यंकटराव मायंदे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या संशोधन केंद्राव्दारे तयार करण्यात आलेल्या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. यावेळी औजारांच्या प्रदर्शनात उपस्थित असणाऱ्या औजारे उत्पादकांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिल कदम, प्रा. महेश पाचारणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.टि.बी. बास्टेवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी संपुर्ण देशातून वेगवेगळ्या संशोधन केंद्राच्या 50 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, औजारे उत्पादक, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कृषी औजारांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)