ऊसबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे हलगी बजाओ आंदोलन

जवळा – ऊसबिलाची थकीत रक्कम आणि थकीत व्याजासाठी शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जामखेड तालुक्‍यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर साखर कारखान्यावर मंगळवारी पाच तास हलगी बजाओ आंदोलन केले. शेवटी थकीत बिलाची रक्कम अदा करण्याचे कारखान्याने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामात जाहीर झालेल्या एफआरपी दरानुसार 2030 चा भाव शेतकऱ्यांना दिला होता. मात्र साखरेच्या दरात आलेल्या मंदीमुळे काही शेतकऱ्यांना 1825 नुसार भाव दिल्याने तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. तसेच व्याजाची रक्कम कारखान्याकडे थकली होती. थकीत पैसे कारखान्याने अदा करावेत या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन हाती घेण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलन दडपण्याचा किंवा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास तर, आम्ही मागे हटणार नाहीत. उलट जय श्रीराम साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन हाती घेईल, अशी भूमिका युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष ऍड. हृषीकेश डूचे व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष हनुमान उगले, अवधुत पवार, शहाजी डोके, गणेश उगले, संदीप काळे, पांडुरंग भोसले, भीमराव पाटील, सुरेश साळुंखे, जनार्दन भोंडवे, अशोक गायकवाड, भीमराव लेंडे, शंकर सुरवसे, पप्पू शिंदे, जनार्धन भोंडवेसह तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

दरम्यान आंदोलकांनी थकीत पेमेंटचा ठोस निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना व्यवस्थापन चर्चेस तयार झाले. तब्बल तीन तास अंदोलक व कारखाना व्यवस्थापनात चर्चा सुरू होती. कार्यकारी संचालक के.एन. निबे यांच्याशी कारखान्याचे मॅनेजर विलास निंबाळकर व इतर अधिकारी तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते दुरध्वनीवरून चर्चा करत होते.

तीन तासानंतर कार्यकारी संचालक के.एन. निबे यांनी अंदोलकांची मागणी मान्य केली. कारखान्याचे वर्क्‍स मॅनेजर मच्छिंद्र भोरकडे, चिफ अकाऊंटंट सोमनाथ शिंदे, केन मॅनेजर, आय. के. कडू पाटील, शेतकी अधिकारी एम.एन. मोहिते या अधिकाऱ्यांनी अंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत उसाचे 205 रूपये प्रमाणे थकीत पेमेंट व 15 टक्के व्याजाची रक्कम देण्याचे मान्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)