विळद शिवारातील अपघातात बीडमधील एकाचा मृत्यू

नगर – नगर-मनमाड रोडवरील विळद शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ टेम्पो आणि दुचाकीचा अपघात होऊन, त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दिलीप धर्मा गुरव (वय 32, रा. नांदुरघाट, ता. केज) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरव याच्याबरोबर दुचाकीवर असलेला त्याचा मित्र सोमनाथ हा गंभीर जखमी झाला आहे. गुलाब आसाराम शेवाळे (रा. वडगावगुप्ता, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी टेम्पोवरील चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

गुलाब, सोमनाथ आणि दिलीप हे तिघे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी नगर-मनमाड रोडवरील विळद शिवारात ते तिघे रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालविले. चालकाने टेम्पोची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सोमनाथ आणि दिलीप या दोघांना धडक दिली. दिलीप यात गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.

सोमनाथ हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धडकेनंतर चालक हा टेम्पो घेऊन पसार झाला. परंतु गुलाब याने टेम्पोचा क्रमांक टिपला होता. एमआयडीसी पोलिसांनी टेम्पोंच्या क्रमांकाची नोंद घेत कारवाईला सुरूवात केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)