जामखेडच्या पाडळी रस्त्यासाठी 68 लाखांचा निधी मंजूर

file photo

पालकमंत्री शिंदे यांच्याकडून 11 दिवसात आश्‍वासनपूर्ती

नगर – जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने जामखेड तालुक्‍यातील पाडळी ते पवारवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रस्त्यासाठी सुमारे 68 लाख 97 हजार 286 रुपयांच्या निधी मिळाला आहे. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी या रस्त्याबाबत 26 डिसेंबरच्या दौऱ्यात ग्रामस्थांना आश्‍वासन दिले होते. अवघ्या 11 दिवसातच रस्त्याच्या कामासाठी निधी देत आश्‍वासनपूर्ती केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या 16 फेब्रुवारीच्या निर्णयान्वये जामखेड तालुक्‍यातील पाडळी ते पवारवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर निधीपैकी 34 लाख 48 हजार सहाशे त्रेचाळीस हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)