मोटारगाडी अडवून चोरांनी साडेचार लाख लांबवले

शहरातील कोठला रस्त्यावर भर दिवसा लूट

नगर – शहराच्या मध्यवर्ती भागात कोठला येथे मोटरगाडी थांबवून चोरांनी तिची काच फोडून 4 लाख 66 हजार रुपये लांबविल्याची घटना आज सायंकाळी घडली. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. त्रिमूर्ती गॅस एजन्सीचे तुषार सोनवणे (रा. श्रीराम चौक, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून जबरी लुटीचे गुन्हा नोंदविला आहे.

तुषार सोनवणे हे आपल्या मोटरगाडीतून कोठला येथून चालले होते. दुचाकीवरील दोघे चोर त्यांच्या मोटरगाडी मागून आले. तुमच्या मोटरगाडीच्या मागे कसला, तरी आवाज येत आहे, असे सांगून चोरांनी सोनवणे यांचे मोटरगाडी थांबवली. सोनवणे यांनी मोटरगाडी थांबविताच चोरांनी तिची काच फोडली.

मोटरगाडीच्या मागील सिटावर असलेल्या पिशवी काढून घेत चोर पसार झाले. या पिशवीत 4 लाख 66 हजार रुपयांची रक्कम होती, असे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरांनी ही चोरी पाळत ठेवून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)