विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू 

देवगाव – शेतीतील विद्युतपंप सुरू करताना विजेचा धक्का बसून सुनिल रावसाहेब आगळे (वय 35) या तरुण शेतकऱ्याचा करूण अंत झाला, ही दुर्देवी घटना देवगाव (ता.नेवासे) शिवारात आगळे वस्ती येथे बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनिल आगळे हे बुधवारी सकाळी घराजवळील शेतात पिकांना पाणी देण्याकरिता विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी कुकाणा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी नेवासे रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुनिल आगळे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भाऊजाई, आई, वडील, आजी, आजोबा असा मोठा परिवार आहे. सुनिल यांना सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)