सात दिवसात चारा छावण्या मंजूर करणार- ना. औटी

संग्रहित छायाचित्र.....

सुपा – यंदा भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तालुक्‍यात पशुधनाच्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न तत्काळ सुटावा, यासाठी येत्या सात दिवसात जनावरांसाठी छावण्या मंजूर करणार असल्याचे ना. विजय औटी यांनी केले.

पारनेर तालुक्‍यातील सुपा पंचायत समिती गणाच्यावतीने विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ना. औटी यांचा सन्मान रायतळे येथे आयोजित करण्यात आला होता. सुपा परीसरातील रस्ता, वीज, पाणी तसेच संजय गांधी योजना, निराधार लोकांसाठी यापुढेदेखील जोमाने काम करणार असल्याचेही ना. औटी यांनी सांगितले. यावेळी रायतळे ग्रामस्थ व परिसरातील ग्रामपंचायतीच्यावतीने औटी यांचा सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, तालुका शिवसेना प्रमुख विकास रोहकले, युवासेना तालुका प्रमुख नितिन शेळके, शिक्षक सेना तालुका प्रमुख सरपंच भाऊसाहेब भोगाडे, विभागप्रमुख आप्पासाहेब देशमुख, निलेश खोडदे, गजानन औटी, वाळवणेचे सरपंच उत्तम पठारे, सुरेश बोरूडे, सुभाष दिवटे, संगिता सोनवणे, भाऊसाहेब येणारे, दत्ता पवार, संतोष येणारे, संभाजी दिवटे, बापूराव साबळे, मिठू येणारे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)