जामखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

जामखेड – नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने जामखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या पालिकांचे कामकाज बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होते.

राज्यातील सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 1 जानेवारीला संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जामखेड नागरपालिकेनेही पाठिंबा दर्शविला. कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले होते.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाची पालिका अप्पर प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुंबई येथे भेट घेतली. संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करीत पालिका कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या मान्यतेच्या अध्यादेशात समावेश करण्याचे आश्वासन दिले. हा अध्यादेश सर्व पालिकांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहे. मागण्या मान्य केल्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले आहे.

यावेळी कक्षअधिकारी महेंद्र ताकपीरे, हितेश वीर, माऊली ओहळ, डी.डी. देशमुख, प्रमोद टेकाळे, रज्जाक शेख, उमेश राऊत, अभिजित भैसडे, कृष्णा वीर, ए. एम. गिते, सुनील बीडकर, राजेंद्र गायकवाड, संजय खेत्रे, लक्ष्मण माने, कृष्ण हुलगुंडे, बद्रुद्दीन काझी, एम.एन. साळवे यांच्यासह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)