शहरातील गोळीबार प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी – शहरात शेवगाव रस्त्यावरील हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट साजरा करताना युवकांच्या वादावादीत झालेल्या गोळीबार प्रकरणात सहाजणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा व अवैधरित्या हत्यार वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याचेकडून घटनेत वापरण्यात आलेले शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दत्तात्रय उर्फ बबलू केरू कांबळे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, थर्टी फस्टच्या रात्री हॉटेल साई श्रद्धामध्ये जेवण करत असताना संतोष विष्णू गायकवाड, सोनू मणियार, सोहेल मणियार, पांडू भांडकर, अभिषेक दानापुरे व एक अल्पवयीन युवक यांनी हॉटेलमध्ये आले. फिर्यादीने आरोपींना जेवायला या असे म्हटल्यावर तू खूप जेवणारा झाला का? असे म्हणत बबलू कांबळे यास लाथाबुक्‍यांनी मारहाण करून संतोष गायकवाड यांनी स्वतः जवळ असलेल्या गावठी कट्ट्यासारख्या शस्त्राने हवेत गोळीबार केला. सोहेल मणियार यांनी टॉमीने मारहाण केली. 31 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत फिर्याद नोंदवली असून या हाणामारीत दत्तात्रय उर्फ बबलू कांबळे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला असून त्यास पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत. त्यांना पोलीस हवालदार अरविंद चव्हाण सहकार्य करत आहेत. याबाबत एका आरोपीला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)