मुलांच्या भांडणावरून नगरच्या बाबा बंगाली चौकात दंगल

नगर – लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून बाबाबंगाली चौकात दंगल झाली. या दंगलीतील सहा जणांनी 30 हजारांचे दागिने लुटून नेले. कोतवाली पोलीस ठाण्यात फराहा अल्ताफ शेख (वय 26) यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नजमुननिसा नजीर शेख, मुजाहीद नजीर शेख, सीमा, तहसीन, कौसर व दानिश (सर्व रा. बाबाबंगाली चौक) यांच्याविरोधात दंगल, त्यात लुटमार करणे, शिवीगाळ करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. लहान मुले खेळत असताना त्यांच्या किरकोळ वाद झाले. मुलांनी एकमेकांना भोवरा मारला. त्याचा जाब आरोपींनी फिर्यादी फराहा शेख यांना विचारत तुझ्या मुलाने माझ्या मुलाला भोवरा का मारला? यावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद सुरू झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाद विकोपाला जाऊन एकमेकांना मारहाण सुरू झाली. लाकडी दांडक्‍याने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. बाबाबंगाली चौकात एकप्रकारे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या मारहाणीत फराहा शेख यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे दागिने हिसकावून घेतले. कोतवाली पोलिसांनी या मारामारीची माहिती मिळताच बाबाबंगाली चौकात गस्त वाढवली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)