युवतीची छेड रोखणाऱ्यावर सात ते आठ टारगटांचा हल्ला

वाडिया पार्क येथील घटना : पैसे चोरले, मोबाईल फोडला


माळीवाड्यातील टारगटांचा वाडिया पार्क भोवती उच्छाद

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर  – वाडियापार्क येथे बोलत उभा असलेल्या युवतीची छेड काढणाऱ्यांना समज देणाऱ्यांवर सात ते आठ टारगटांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. लाकडी दांडक्‍याने मारहाण करत या टारगटांनी जखमी खिशातील रोख रक्कम काढून घेतली, तर मोबाईल फोडला आहे. स्वप्नील नजन (रा. स्टेशन रोड, शिवनेरी चौक) यांच्या फिर्याद दिली आहे. किशोर शहाजी थोरवे (रा. बुरूडगाव रोड), अरुण श्रीरामचंद्र पटेल, रवी प्रेमलाल आदिवासी, अनिसकुमार श्रीरामभजन नामदेव, पोलाट बादल (सर्व रा. प्रगती हॉटेलजवळ माळीवाडा) यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

आकाश आणि त्याची मैत्रीण ही वाडियापार्क येथे बोलत होते. त्यावेळी काही टारगट त्यांच्यावर नजर ठेवून होते. त्यातील काहींनी युवतीकडे पाहून “ये चलती क्‍या,’ असे म्हणून छेड काढली. त्यावर फिर्यादी स्वप्नील नजन याने या टारगटांना हटकले. तरीही टारगट युवतीची छेड काढत होते. स्वप्नील याने पुढे होऊन “जावू दे मित्रा,’ अशी समज दिली. टारगटांना याचा राग आला. लगेचच स्वप्नील याला टारगटांनी घेरून मारहाण करण्यास सुरूवात केली. स्वप्नील याचा मित्र आकाश तिथेच होता. आकाश ही भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला. या टारगटांनी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले.

सुमारे सात ते आठ टारगटांनी स्वप्नील व आकाश या दोघांना घेरून लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करताना आकाश याच्या खिशातील 2 हजार 300 रुपये काढून घेतले. त्यानंतर स्वप्नील याचा मोबाईल आपटून फोडून टाकला. स्वप्नील नजन याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी या टारगटांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)